५२. धंदा
आहोत खरे अज्ञानी आम्ही
पण स्वत:स म्हणवतो ज्ञानी
बोंबलत असतो सदान् कदा
संस्कृतीचे आम्ही अभिमानी
ठेवतात विश्वास लोक बिचारे
त्यांनाही नसते अक्कल
देतो उपदेश ज्याला त्याला
करतो देवाचीच नक्कल
पिढ्यान् पिढ्या वर्षानुवर्षे
हाच आमचा धंदा
खाऊन पिऊन सुखी आहोत
कुणी कितीही निंदा
--- लबाड बोका
आहोत खरे अज्ञानी आम्ही
पण स्वत:स म्हणवतो ज्ञानी
बोंबलत असतो सदान् कदा
संस्कृतीचे आम्ही अभिमानी
ठेवतात विश्वास लोक बिचारे
त्यांनाही नसते अक्कल
देतो उपदेश ज्याला त्याला
करतो देवाचीच नक्कल
पिढ्यान् पिढ्या वर्षानुवर्षे
हाच आमचा धंदा
खाऊन पिऊन सुखी आहोत
कुणी कितीही निंदा
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा