३ . संस्कार
मनात सुविचार
रुजवतात संस्कार
वागण्यात सौजन्य
आणतात संस्कार
मनाला आकार
देतात संस्कार
दगडातून मूर्ती
घडवतात संस्कार
मनाला आवर
घालतात संस्कार
वाकडं पाऊल
अडवतात संस्कार
विकारांना नकार
देतात संस्कार
मनाची शुद्धी
राखतात संस्कार
वाईटाचा धिक्कार
करतात संस्कार
मनाला निर्भय
बनवतात संस्कार
श्रमाचा पुरस्कार
करतात संस्कार
अंगी स्वाभिमान
बाणवतात संस्कार
नीतीमत्तेचे आचार
शिकवतात संस्कार
चारित्र्यवान माणूस
घडवतात संस्कार
मांगल्याचा स्विकार
करतात संस्कार
माणसाला देव
बनवतात संस्कार
--- लबाड बोका
मनात सुविचार
रुजवतात संस्कार
वागण्यात सौजन्य
आणतात संस्कार
मनाला आकार
देतात संस्कार
दगडातून मूर्ती
घडवतात संस्कार
मनाला आवर
घालतात संस्कार
वाकडं पाऊल
अडवतात संस्कार
विकारांना नकार
देतात संस्कार
मनाची शुद्धी
राखतात संस्कार
वाईटाचा धिक्कार
करतात संस्कार
मनाला निर्भय
बनवतात संस्कार
श्रमाचा पुरस्कार
करतात संस्कार
अंगी स्वाभिमान
बाणवतात संस्कार
नीतीमत्तेचे आचार
शिकवतात संस्कार
चारित्र्यवान माणूस
घडवतात संस्कार
मांगल्याचा स्विकार
करतात संस्कार
माणसाला देव
बनवतात संस्कार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा