४ . पाऊस
आला सोसाट्याचा वारा
ढगांनीही गर्दी केली
कडाडती वीजा तशी
पावसाची वर्दी आली
उतरती नभातून
जलधारा शुभ्र खाली
तृषार्त ही सृष्टी सारी
तृप्त तृप्त होऊन गेली
विझला वैशाख वणवा
गेली ग्रीष्माची काहिली
ढगांनीच धरली आता
वर मायेची सावली
मृगाच्या धारांनीही
जादू अशी केली
प्रकटले धबधबे
नदी व्हाती झाली
कृतार्थ ही धरणी आता
लेकुरवाळी झाली
रोमारोमातून कशी
हिरवी पाती व्याली
असे खळखळे पाणी अन
घुमे आवाज रानी
पक्ष्यांनाही कशी सुचती
मंजुळ मंजुळ गाणी
हितगुज पाखरांचे हे
चाले कानोकानी
सुखावलेली झाडे आता
खुलती पानोपानी
सृष्टिलाही कशी आता
नवी उभारी आली
भूमीवरी उमटली आता
हिरवी रंगावली
--- लबाड बोका
आला सोसाट्याचा वारा
ढगांनीही गर्दी केली
कडाडती वीजा तशी
पावसाची वर्दी आली
उतरती नभातून
जलधारा शुभ्र खाली
तृषार्त ही सृष्टी सारी
तृप्त तृप्त होऊन गेली
विझला वैशाख वणवा
गेली ग्रीष्माची काहिली
ढगांनीच धरली आता
वर मायेची सावली
मृगाच्या धारांनीही
जादू अशी केली
प्रकटले धबधबे
नदी व्हाती झाली
कृतार्थ ही धरणी आता
लेकुरवाळी झाली
रोमारोमातून कशी
हिरवी पाती व्याली
असे खळखळे पाणी अन
घुमे आवाज रानी
पक्ष्यांनाही कशी सुचती
मंजुळ मंजुळ गाणी
हितगुज पाखरांचे हे
चाले कानोकानी
सुखावलेली झाडे आता
खुलती पानोपानी
सृष्टिलाही कशी आता
नवी उभारी आली
भूमीवरी उमटली आता
हिरवी रंगावली
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा