२७ फेब्रुवारी २०१२ मराठी भाषा दिनानिमित्त
५०. जयघोष माय मराठीचा
प्राणाहूनही प्रिय मला तू
मनात माझ्या नाही किंतु
या देहाची वाचा तर तू
माय मराठी जयतु जयतु
जात्यावरची ओवी तर तू
कचकचणारी शिवी तर तू
सानथोरांना हवी हवी तू
माय मराठी जयतु जयतु
अभंगातील भक्ती तर तू
रणघोषातील शक्ती तर तू
पोवाड्यातील स्फूर्ती तर तू
माय मराठी जयतु जयतु
लावणीतला शृंगार तर तू
वीररसातला अंगार तर तू
या मातीचा हुंकार तर तू
माय मराठी जयतु जयतु
स्वराज्याची राजभाषा तू
अमृताते पैजा जिंक तू
हो लवकरी ज्ञानभाषा तू
माय मराठी जयतु जयतु
--- लबाड बोका
५०. जयघोष माय मराठीचा
प्राणाहूनही प्रिय मला तू
मनात माझ्या नाही किंतु
या देहाची वाचा तर तू
माय मराठी जयतु जयतु
जात्यावरची ओवी तर तू
कचकचणारी शिवी तर तू
सानथोरांना हवी हवी तू
माय मराठी जयतु जयतु
अभंगातील भक्ती तर तू
रणघोषातील शक्ती तर तू
पोवाड्यातील स्फूर्ती तर तू
माय मराठी जयतु जयतु
लावणीतला शृंगार तर तू
वीररसातला अंगार तर तू
या मातीचा हुंकार तर तू
माय मराठी जयतु जयतु
स्वराज्याची राजभाषा तू
अमृताते पैजा जिंक तू
हो लवकरी ज्ञानभाषा तू
माय मराठी जयतु जयतु
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा