९४. कैफ
उमटती कसे कळेना
मन तरंग सैरावैरा
आकंठ बुडालो त्यात
तो डोहच आहे गहिरा
आहे कुठे पर्याय
नाहीच आता सुटका
घेऊ आधार कशाचा
तो काठही आहे तुटका
उपभोगतो कैफात तरीही
माझेच मरण मी आता
गातो मी स्वछंदाने
विरताना जाता जाता
-- लबाड बोका
उमटती कसे कळेना
मन तरंग सैरावैरा
आकंठ बुडालो त्यात
तो डोहच आहे गहिरा
आहे कुठे पर्याय
नाहीच आता सुटका
घेऊ आधार कशाचा
तो काठही आहे तुटका
उपभोगतो कैफात तरीही
माझेच मरण मी आता
गातो मी स्वछंदाने
विरताना जाता जाता
-- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा