९३. वृक्षतोड
थांबली आहे केव्हाचीच
पानांची ती सळसळ
काय उपयोग सांगा
वाटून आता हळहळ
तोडली ह्या हातांनीच
मी सुंदर सुंदर झाडे
माझ्याच तर पूर्वजांनी
जपली होती जिवापाडे
कशी झाली दुर्बुद्धी
काय करून बसलो
पैशाच्या हव्यासापोटी
असा कसा फसलो
गेला तो गारवा अन्
संपला सारा किलबिलाट
रडतोय आता ढसाढसा
बडवून आपला ललाट
--- लबाड बोका
थांबली आहे केव्हाचीच
पानांची ती सळसळ
काय उपयोग सांगा
वाटून आता हळहळ
तोडली ह्या हातांनीच
मी सुंदर सुंदर झाडे
माझ्याच तर पूर्वजांनी
जपली होती जिवापाडे
कशी झाली दुर्बुद्धी
काय करून बसलो
पैशाच्या हव्यासापोटी
असा कसा फसलो
गेला तो गारवा अन्
संपला सारा किलबिलाट
रडतोय आता ढसाढसा
बडवून आपला ललाट
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा