९६. नाळ
दु:खातही जगताना मी
पाहिले स्वप्न सुखांचे
आकाशही असते वेडे
बळभरल्या अशाच पंखांचे
केले प्रयत्न मी अविरत
कधी जायचो खचून
गायचो आरती यशाची
माझी मीच रचून
झाले साकार स्वप्न
घातली यशाने माळ
होती तरीही जोडलेली
दु:खाशी यशाची नाळ
--- लबाड बोका
दु:खातही जगताना मी
पाहिले स्वप्न सुखांचे
आकाशही असते वेडे
बळभरल्या अशाच पंखांचे
केले प्रयत्न मी अविरत
कधी जायचो खचून
गायचो आरती यशाची
माझी मीच रचून
झाले साकार स्वप्न
घातली यशाने माळ
होती तरीही जोडलेली
दु:खाशी यशाची नाळ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा