१९९. उगाच आपलं काहीतरी
पक्ष म्हणजे असतात टोळ्या
काही उजव्या काही डाव्या
सर्वांनाच हव्या असतात
फक्त तिजोरीच्या चाव्या
सत्ताधारी असतात भ्रष्टाचारी
विरोधक करतात विरोध त्यांना
सत्तापालट झाल्यावरती
तेच करायचं असतं ह्यांना
उगाच देतात घोषणा बिषणा
उगाच काढतात मोर्चे बिर्चे
साटेलोटे असतात त्यांचे
मलई खातात सगळे वरचे
देतात उघड खोटी आश्वासने
लोकांनाही माहित असते
तरीही पुन्हा देतात मते
लोकांना तर अक्कलच नसते
असेच माजत रहाणार हे
कोणालाच काही पडली नाही
देश चाललाय रसातळाला
तरीही क्रांती होत नाही
षंढ लोकांची लोकशाही
असंच होणार नाहीतरी
कसली आलीय क्रांती ब्रिंती
उगाच आपलं काहीतरी
--- लबाड बोका
पक्ष म्हणजे असतात टोळ्या
काही उजव्या काही डाव्या
सर्वांनाच हव्या असतात
फक्त तिजोरीच्या चाव्या
सत्ताधारी असतात भ्रष्टाचारी
विरोधक करतात विरोध त्यांना
सत्तापालट झाल्यावरती
तेच करायचं असतं ह्यांना
उगाच देतात घोषणा बिषणा
उगाच काढतात मोर्चे बिर्चे
साटेलोटे असतात त्यांचे
मलई खातात सगळे वरचे
देतात उघड खोटी आश्वासने
लोकांनाही माहित असते
तरीही पुन्हा देतात मते
लोकांना तर अक्कलच नसते
असेच माजत रहाणार हे
कोणालाच काही पडली नाही
देश चाललाय रसातळाला
तरीही क्रांती होत नाही
षंढ लोकांची लोकशाही
असंच होणार नाहीतरी
कसली आलीय क्रांती ब्रिंती
उगाच आपलं काहीतरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा