२४९. सत्यमार्ग
ते पहातात अजून
शुभाशुभाच्या वेळा
आम्ही फिरवलाय कधीचा
ज्योतिषावरती बोळा
ते मानतात अजून
शकुन आणि अपशकुन
आम्ही वागतो बिनधास्त
दिलंय सगळं टाकून
ते माजवतात अजून
कर्मकांडाचं अवडंबर
आम्ही पडतो पाया
फक्त वाकवून कंबर
ते गुरफटलेत अजून
सोवळ्या ओवळ्यामध्ये
आम्ही पहातो देव
एवढ्या तेवढ्यामध्ये
ते अडकलेत अजून
जन्म मृत्यूच्याच फेऱ्यात
आम्ही मिळवतो मोक्ष
तरी असतो साऱ्यांत
--- लबाड बोका
ते पहातात अजून
शुभाशुभाच्या वेळा
आम्ही फिरवलाय कधीचा
ज्योतिषावरती बोळा
ते मानतात अजून
शकुन आणि अपशकुन
आम्ही वागतो बिनधास्त
दिलंय सगळं टाकून
ते माजवतात अजून
कर्मकांडाचं अवडंबर
आम्ही पडतो पाया
फक्त वाकवून कंबर
ते गुरफटलेत अजून
सोवळ्या ओवळ्यामध्ये
आम्ही पहातो देव
एवढ्या तेवढ्यामध्ये
ते अडकलेत अजून
जन्म मृत्यूच्याच फेऱ्यात
आम्ही मिळवतो मोक्ष
तरी असतो साऱ्यांत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा