६२९. सापेक्षतावाद
काहीच नसतं आधी आणि
काहीच नसतं नंतर
जन्मापासून मरणापर्यंत
तेवढंच असतं खरंतर
जन्मसुद्धा नसतो हातात
घटना घडते साधी
कोणीतरी येतात जवळ
नर आणि मादी
कसल्या कसल्या भावनांनी
भरून जातो कप्पा
मरणाबरोबर जातात संपून
सगळ्या बाजारगप्पा
भाषा जात धर्म राष्ट्र
असतं खरंतर लहान
जन्मामुळेच वाटतं फक्त
हे सगळं महान
--- लबाड बोका
काहीच नसतं आधी आणि
काहीच नसतं नंतर
जन्मापासून मरणापर्यंत
तेवढंच असतं खरंतर
जन्मसुद्धा नसतो हातात
घटना घडते साधी
कोणीतरी येतात जवळ
नर आणि मादी
कसल्या कसल्या भावनांनी
भरून जातो कप्पा
मरणाबरोबर जातात संपून
सगळ्या बाजारगप्पा
भाषा जात धर्म राष्ट्र
असतं खरंतर लहान
जन्मामुळेच वाटतं फक्त
हे सगळं महान
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा