६७१. मी सुद्धा
मला सुद्धा वाटत नाही
भल्या बुऱ्याची चाड
मी सुद्धा केली आहे
कधी छेड छाड
मी सुद्धा शिकलो आहे
सगळ्या गोष्टी खोट्या
मी सुद्धा मारल्या आहेत
त्यांना पाहून शिट्ट्या
मला सुद्धा माहित आहेत
सगळे पंजे छक्के
मी सुद्धा गर्दीमध्ये
मारले आहेत धक्के
मी सुद्धा घेतला आहे
सगळ्याचा परामर्श
मी सुद्धा केला आहे
नको तिथे स्पर्श
मला सुद्धा आवडत नाही
लावावयाला लांबण
मी सुद्धा घेतलं आहे
नको असताना चुंबन
मी सुद्धा पाडला आहे
कामशास्त्राचा पिट्ट्या
मी सुद्धा मारल्या आहेत
जबरदस्ती मिठ्या
मी सुद्धा बाळगून असतो
सोयीस्करसं मौन
मी सुद्धा केलं आहे
तसं शोषण यौन
--- लबाड बोका
मला सुद्धा वाटत नाही
भल्या बुऱ्याची चाड
मी सुद्धा केली आहे
कधी छेड छाड
मी सुद्धा शिकलो आहे
सगळ्या गोष्टी खोट्या
मी सुद्धा मारल्या आहेत
त्यांना पाहून शिट्ट्या
मला सुद्धा माहित आहेत
सगळे पंजे छक्के
मी सुद्धा गर्दीमध्ये
मारले आहेत धक्के
मी सुद्धा घेतला आहे
सगळ्याचा परामर्श
मी सुद्धा केला आहे
नको तिथे स्पर्श
मला सुद्धा आवडत नाही
लावावयाला लांबण
मी सुद्धा घेतलं आहे
नको असताना चुंबन
मी सुद्धा पाडला आहे
कामशास्त्राचा पिट्ट्या
मी सुद्धा मारल्या आहेत
जबरदस्ती मिठ्या
मी सुद्धा बाळगून असतो
सोयीस्करसं मौन
मी सुद्धा केलं आहे
तसं शोषण यौन
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा