६७०. मिरच्या
कारणाशिवाय होत नाही
कधीच कुठची चर्चा
नको तेव्हा नको तिथे
झोंबतात मग मिरच्या
असल्या म्हणून काय झालं
असल्या जरी घरच्या
पिकल्या तरी होत नाहीत
गोड कधीच मिरच्या
देत असतात लोक सदिच्छा
उगाच वरवरच्या
स्वानुभवाने सांगतो आहे
तिखटच असतात मिरच्या
--- लबाड बोका
कारणाशिवाय होत नाही
कधीच कुठची चर्चा
नको तेव्हा नको तिथे
झोंबतात मग मिरच्या
असल्या म्हणून काय झालं
असल्या जरी घरच्या
पिकल्या तरी होत नाहीत
गोड कधीच मिरच्या
देत असतात लोक सदिच्छा
उगाच वरवरच्या
स्वानुभवाने सांगतो आहे
तिखटच असतात मिरच्या
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा