६ . तुझी नजर
तुझी नजर,हळूवार
नजरेत तुझ्या प्रेम फार
तुझ्या अशा नजरेने
मी होतो हतबल पार
तुझी नजर, भाव विभोर
मनात माझ्या नाचती मोर
नजरेत तुझ्या दडला आहे
एक लबाड काळीज चोर
तुझी नजर, भलतीच ओढाळ
नजरेत तुझ्या भाव मधाळ
नको असं पाहूस मला
जीव माझा होतो घायाळ
तुझी नजर, थोडी खट्याळ
बघत नाही वेळ काळ
तुझ्या अशा नजरेने
सुटू बघतो माझा ताळ
तुझी नजर, मदनबाण
व्याकूळ माझे पंचप्राण
सांगून तुला कळणार नाही
माझी अशी ओढाताण
तुझी नजर, धारदार
काळजात माझ्या करते वार
अलगद उचलून नेई घार
तशी माझी होई शिकार
तुझी नजर, बेधुंद
मन माझे होई कुंद
तुझ्या अशा नजरेनेच
जडला मला तुझा छंद
तुझी नजर, मिलनातुर
मनात माझ्या उठते काहूर
नजरेनेच तुझ्या लावली मला
एक नवीच अनामिक हूरहूर
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा