७ . काय हे
असा कसा करताहेत हे
सरळ सरळ वाईट विचार
काय ह्यांच्यावर झाले नव्हते
कधीच का चांगले संस्कार
असा कसा माजला आहे
सगळीकडेच भ्रष्टाचार
काय ह्यांना शिकवले नव्हते
कोणी चांगले शिष्टाचार
असा कसा चढला आहे
ह्यांना आज एवढा माज
काय ह्यांना ठाऊक नाही
सोडायची नसते आपली लाज
असा कसा झाला आहे
प्रत्येकजण बेईमान
काय ह्यांना कळत नाही
विकायचे नसते आपले ईमान
असा कसा राहिला नाही
कोणाचाच शिल्लक स्वाभिमान
काय ह्यांना माहीत नाही
राखायचा असतो आपला मान
असा कसा चालला आहे
सा-याचाच इथे व्यापार
काय ह्यांना समजत नाही
बुडवायचा नसतो देशच पार
असा कसा भरला आहे
खोट्याचाच इथे बाजार
काय ह्यांना दिसत नाही
लोक किती झालेत बेजार
असा कसा करताहेत हे
लोकांवरती अत्याचार
काय ह्यांना अडविणारा
कुणीच नाही का मुखत्यार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा