८. सर्व धर्मीय अतिरेक्यांनो
धर्माच्या नावे करता
जीव घेणे हे स्फोट
विचारांतच आहे तुमच्या
नक्की काहीतरी खोट
झाला पहा कसा
रक्त मांसाचा चिखल
विनाकारणच झाले
पहा कितीक हे विकल
काळीज फाडतो हा
आप्तांचा विलाप
काय मिळविले तुम्ही
मारुन हे निष्पाप
झाला जीव का शांत
ऐकून हा आक्रोश
विकृतच असाल तुम्ही
मानाल जर संतोष
हेच शिकवितो काय
तुम्हाला तुमचा बाप
चुकता आहात तुम्ही
होईल पश्चाताप
फेडाल कुठे हे असले
महाभयंकर पाप
भोवतील तुम्हालाच
अश्राप जीवांचे शाप
का धोपटता भुई
सोडून विखारी साप ( सर्व पक्षीय राजकारणी )
पदरात टाका त्यांच्या
त्यांच्याच चुकांचे माप
असेल हिम्मत तुमची
करा घाण ती साफ ( सर्व पक्षीय राजकारणी )
चुका तुमच्या सगळ्या
करून टाकू माफ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा