१२. मैत्री
मैत्री असतं एक नातं
दोन मनांना एक करतं
कधी सुखात कधी दु:खात
कायमच सोबत करतं
मैत्री असतो एक छंद
दोन जीवांचा नाजुक बंध
मैत्रीमुळेच दरवळतो जीवनात
एक अनोखा आनंद गंध
मैत्रीमध्ये असतो विश्वास
एकमेकांचा नसतो त्रास
हवाहवासा वाटत असतो
परस्परांचा फक्त सहवास
मैत्री म्हणजे सुंदर स्वप्न
एक दुस-याचं मन जपणं
कधी चुका केल्याच तर
मैत्रीच्याच आड लपणं
मैत्री सांगत असते हितगुज
मैत्री करत नसते कुजबुज
मैत्रीच येते मदतीला
मैत्रीचीच राखून बूज
मैत्री असतो एक अनुभव
प्रेमाचाच दाट संभव
किती काही झालं तरी
ताटातूट जणू असंभव
मैत्री असते हक्काची खरी
सहाय्याची हमखास खात्री
कधी गरज लागली तर
उठवावं जाऊन अर्ध्यारात्री
मैत्री वाटतं कधी ओझं
करायचं नसतं मन खुजं
कधी राग आला तरी
म्हणायचं नसतं माझं तुझं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा