१३. शब्द
शब्द म्हणजे संवाद
शब्दाला असतो स्वाद
कडू जार शब्दांनी
शब्द घालतो वाद
शब्दात असते आशा
शब्दात असते नशा
शब्द पिकवितो हशा
शब्दाने बनते भाषा
शब्दाने जुळते तार
शब्दाने होतो व्यवहार
दोन गोड शब्दांनी
होतो सर्व श्रमपरिहार
शब्द म्हणजे तीर
नाही परत फिरणार
भला असो वा बुरा
काळजास भिडणार
शब्द करतो वार
शब्दाला असते धार
कधी पुरेसा असतो
शहाण्याला शब्दांचा मार
शब्द भिडतो थेट
शब्दाला असतो नेट
शब्द घडवितो कधी
वैऱ्यांतही समेट
शब्दाने वाढतो शब्द
शब्द पहातो स्वार्थ
काढून भलता अर्थ
शब्द घडवितो अनर्थ
--- लबाड बोका
शब्द म्हणजे संवाद
शब्दाला असतो स्वाद
कडू जार शब्दांनी
शब्द घालतो वाद
शब्दात असते आशा
शब्दात असते नशा
शब्द पिकवितो हशा
शब्दाने बनते भाषा
शब्दाने जुळते तार
शब्दाने होतो व्यवहार
दोन गोड शब्दांनी
होतो सर्व श्रमपरिहार
शब्द म्हणजे तीर
नाही परत फिरणार
भला असो वा बुरा
काळजास भिडणार
शब्द करतो वार
शब्दाला असते धार
कधी पुरेसा असतो
शहाण्याला शब्दांचा मार
शब्द भिडतो थेट
शब्दाला असतो नेट
शब्द घडवितो कधी
वैऱ्यांतही समेट
शब्दाने वाढतो शब्द
शब्द पहातो स्वार्थ
काढून भलता अर्थ
शब्द घडवितो अनर्थ
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा