१४ . फुंकर
चुकलं माझं असेल काहीतर
खरोखरच मी आहे दिलगीर
ठेव भरवसा तू माझ्यावर
माझं आहे प्रेम तुझ्यावर
नाही चित्त माझे थाऱ्यावर
तुझीच छाप दिसे साऱ्यावर
कसे आवरू भाव अनावर
प्रीत कोरली तुझी मनावर
ओढ लागली तुझी अनिवार
उदास झाले सण आणि वार
एकवार जर येशील तू जर
एकवार जर येशील तू जर
होईन ऋणी मी तुझा जन्मभर
दिलाय सोडून मी अहंकार
ये परतून तू आता एकवार
दुखावलेल्या तुझ्या मनावर
घालीन फुंकर मी हळूवार
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा