१५ . उत्कट प्रेम
मी तुझ्यावर प्रेम केलंय
झेपावणा-या लाटांसारखं
तू नेहमीच दूर लोटलंस
ह्रदयशून्य किनाऱ्यासारखं
मी प्रेम करतच राहीन
उधाणाच्या सागरासारखं
कधीतरी तू नक्कीच हरशील
त्या खचलेल्या किनाऱ्यासारखं
वाट बघतोय त्या क्षणाची
करून मन चातकासारखं
तू ही करशील उत्कट प्रेम
माझ्यावरती माझ्यासारखं
--- लबाड बोका
वाट बघतोय त्या क्षणाची
करून मन चातकासारखं
तू ही करशील उत्कट प्रेम
माझ्यावरती माझ्यासारखं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा