१६ . जाणीव
मौनात माझ्या जाणवेल तुला
तुझ्यावरचं अव्यक्त प्रेम
मनात चिंतून जगत आहे
तुझंच कुशल मंगल क्षेम
नजरेत माझ्या जाणवेल तुला
तुझ्यावरचा अपार विश्वास
जणू घेऊन जगत आहे
तुझ्यातलाच अर्धा श्वास
स्पर्शात माझ्या जाणवेल तुला
तुझ्यावरचं उत्कट प्रेम
आणि ठेवून जगत आहे
तुझ्यावरच सारा नेम
भेटीत माझ्या जाणवेल तुला
तुझीच फक्त अनिवार ओढ
आणि आठवून जगत आहे
तुझ्याच फक्त आठवणी गोड
मिठीत माझ्या जाणवेल तुला
तुझ्यावरची अपार माया
आणि होऊन जगत आहे
जणू काही तुझीच छाया
वागण्यात माझ्या जाणवेल तुला
तुझ्याबद्दल आदरभाव
आणि घेऊन जगत आहे
रोज फक्त तुझंच नाव
बोलण्यात माझ्या जाणवेल तुला
तुझ्यावरची माया ममता
आणि करून जगत आहे
तुझीच फक्त काळजी चिंता
जगण्यात माझ्या जाणवेल तुला
तुझी फक्त तुझीच आस
आणि घेऊन जगत आहे
ध्यानीमनी तुझाच ध्यास
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा