१७ . पहिला पाऊस
काळे काळे ढग कसे दाटले अंबरी
सोसाट्याचा वारा मन होई रानभरी
कडाडती वीजा नभ येई धरेवरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
गार गार थेंब अंगी येई शिरशिरी
मनामध्ये उठतात आनंद लहरी
अवखळ मन माझे होई पिसापरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
भिजूनिया देह माझा होई चिंब तरी
अतृप्तच मी अजूनीया खोल अंतरी
घुमतसे चित्त माझे द्वाड वा-यापरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
--- लबाड बोका
काळे काळे ढग कसे दाटले अंबरी
सोसाट्याचा वारा मन होई रानभरी
कडाडती वीजा नभ येई धरेवरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
गार गार थेंब अंगी येई शिरशिरी
मनामध्ये उठतात आनंद लहरी
अवखळ मन माझे होई पिसापरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
भिजूनिया देह माझा होई चिंब तरी
अतृप्तच मी अजूनीया खोल अंतरी
घुमतसे चित्त माझे द्वाड वा-यापरी
कोसळती अंगावरी लक्ष लक्ष सरी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा