९. हात
दाखवू नका
ज्योतिष्याला हात
अवलक्षणेच
होतील ज्ञात
धरू नका
हातावर हात
नैराश्याला
गाडा आत
संकटाशी करा
दोन हात
भयगंडावर
करा मात
परतू नका
हलावित हात
मनात पेटवा
आशेची वात
पसरू नका
कोणापुढे हात
नका बसू
आयतं खात
ठेवू नका
कानावर हात
नरकात जातील
पिढ्या सात
मारू नका
हातावर हात
अति शहाणपणा
करील घात
जगाचा नाथ
आपला हात
द्या टाकून
जूनी कात
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा