२० . स्वातंत्र्य रण
रणाविण स्वातंत्र्य
आम्हा मिळाले
खोटेच आहेत
असे सांगणारे
उदगार त्यांचे हे
आहेत झोंबणारे
हुतात्म्यांच्या त्यागाचे
श्रेय हिरावणारे
मुर्ख होते काय ते
क्रांतीसाठी लढणारे
कोवळया वयात
फासावर चढणारे
कित्येकांनी ठेविले
घरावरी निखारे
आयुष्याचे केले त्यांनी
स्वत:हून मातेरे
बुद्ध्याची पत्करिला हो
त्यांनी असा वनवास
पकडले गेले त्यांच्या
नशिबी कारावास
जगण्यात त्यांच्या होता
फक्त एकच ध्यास
स्वातंत्र्यासाठी लागला
गळ्यास त्यांच्या फास
जरी झाली त्यांच्या
संसाराची होळी
तरी झेलली त्यांनी
छातीवरती गोळी
हे रण नव्हते
तर काय होते
उगीच द्यावयास का
जीव वर आले होते
रणात कामी आली
आझाद हिंद सेना
तरीही कसे म्हणता
स्वातंत्र्य मिळाले रणाविणा
रणानेच स्वातंत्र्य
आम्हा मिळाले
रणी सांडलेले
रक्त बोलते हे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा