१९ . आयुष्य
नशिबात जे बरंवाईट असतं
त्याला सामोरं जायचं असतं
नशिबावर चिडून काही होत नसतं
कारण नशिब आपल्या हातात नसतं
आयुष्यात जसं वाईट घडतं
तसंच चांगलही घडत असतं
चांगल्यालाच महत्व द्यायचं असतं
चांगल्यातून चांगलं घ्यायचं असतं
दुख्ख नैराश्य येतच असतं
तेच कवटाळून बसायचं नसतं
सुख समाधान जेवढं मिळतं
तेच खूप म्हणायचं असतं
स्वत:चं दुख्ख गिळायचं असतं
दुस-याचं सुख मानायचं असतं
मन मोठं करायचं असतं
आयुष्य असंच जगायचं असतं
दुस-यांवर उगीच रागवायचं नसतं
मनातल्या मनात कुढायचं नसतं
आयुष्य एकदाच मिळत असतं
ते आनंदात जगायचं असतं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा