२१ . बदल
सुटे सोसाट्याचा वारा
उडे धुरळा पाचोळा
ऋतूबदलाचा होई
सुरू अनोखा सोहळा
जाई सूर्य ढगाआड
अन् दाटे हा काळोख
येई मृगाचा पाऊस
त्याची जुनीच ओळख
गोल गोल मोठे थेंब
जाती मातीत मुरून
तोच परिचित वास
जाई श्वासात भरून
गार गार मोठे थेंब
जाई अंग मोहरून
पुरं गळलेलं मन
येई पुन्हा बहरून
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा