महाराष्ट्रातील कोंग्रेसवाल्यांना उद्देशून
१०. गाज
तुमची जरी नसली तरी
आमची थोर संस्कृती आहे
तुमच्या वागण्या बोलण्यात फक्त
लाचारीची विकृती आहे
तुमच्या जरी नसली तरी
मनात आमच्या हिम्मत आहे
इथून तिथून लाथा खायची
तिच तुमची किम्मत आहे
तुमचं जरी नसलं तरी
रक्त आमचं गरम आहे
महाराष्ट्रात जन्मलो आम्ही
भाग्य आमचं परम आहे
तुमच्या जरी नसली तरी
अंगात आमच्या धमक आहे
उभ्या आडव्या महाराष्ट्राची
आमच्या मागे कुमक आहे
तुम्हाला जरी नसला तरी
आम्हाला आमचा स्वाभिमान आहे
आमच्या मातृभाषेचा
आम्हाला सार्थ अभिमान आहे
तुमचा जरी नसला तरी
कणा आमचा ताठ आहे
याद राखा महाराष्ट्र द्रोहयांनो
आमच्याशी गाठ आहे
तुमचा जरी नसला तरी
मराठी आमचा बाणा आहे
तुमच्यासाठी आम्ही आता
उभारला हा फणा आहे
तुमच्या जरी नसला तरी
मनात आमच्या शिवराज आहे
मराठ्यांच्या असंतोषाची
आज गर्जत गाज आहे
--- लबाड बोका
१०. गाज
तुमची जरी नसली तरी
आमची थोर संस्कृती आहे
तुमच्या वागण्या बोलण्यात फक्त
लाचारीची विकृती आहे
तुमच्या जरी नसली तरी
मनात आमच्या हिम्मत आहे
इथून तिथून लाथा खायची
तिच तुमची किम्मत आहे
तुमचं जरी नसलं तरी
रक्त आमचं गरम आहे
महाराष्ट्रात जन्मलो आम्ही
भाग्य आमचं परम आहे
तुमच्या जरी नसली तरी
अंगात आमच्या धमक आहे
उभ्या आडव्या महाराष्ट्राची
आमच्या मागे कुमक आहे
तुम्हाला जरी नसला तरी
आम्हाला आमचा स्वाभिमान आहे
आमच्या मातृभाषेचा
आम्हाला सार्थ अभिमान आहे
तुमचा जरी नसला तरी
कणा आमचा ताठ आहे
याद राखा महाराष्ट्र द्रोहयांनो
आमच्याशी गाठ आहे
तुमचा जरी नसला तरी
मराठी आमचा बाणा आहे
तुमच्यासाठी आम्ही आता
उभारला हा फणा आहे
तुमच्या जरी नसला तरी
मनात आमच्या शिवराज आहे
मराठ्यांच्या असंतोषाची
आज गर्जत गाज आहे
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा