३५ . निरोप
निरोप तुज द्यावया
मज शब्द सापडेना
नि:शब्द भावनांचा
आक्रंद मांडलेला
शब्द ही फुटेना
जीव मौनलेला
मौनात भावनांचा
कल्लोळ माजलेला
लपवू तरी कसा मी
चेहरा ओढलेला
चेह-यात भावनांचा
भाव सांडलेला
समजून घेशील काय
मुक्या या मनाला
मनात भावनांचा
गहिवर दाटलेला
एकवार रूप तुझे
साठवू दे डोळा मला
डोळ्यात भावनांचा
डोह साचलेला
ठेवीन जपून माझ्या
हृदयात मी तुला
हृदयात भावनांचा
पूर दाटलेला
बोलून पाडू नको तू
घरे काळजाला
काळजात भावनांचा
भलताच गलबला
कशा आवरू मी
या अनावर भावना
दाटले हे हुंदके
मज रडू आवरेना
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा