३४ . दुष्काळ
केले पावसाने काळे
आणू कुठून मी पाणी
नद्या ओहळ आटले
झाली धरणे निकामी
येता येईना पाऊस
मावळली आशा सारी
काय वाढले पुढ्यात
काही कळतच नाही
सुकलेल्या जमिनीला
खोल खोल गेल्या भेगा
नव्हत्या करीत सावध
हातावरच्याही रेघा
सुकलेल्या जमिनीला
खोल खोल गेल्या भेगा
नव्हत्या करीत सावध
हातावरच्याही रेघा
गेली झाडे ही सुकून
गुरांनाही चारा नाही
मारी वासरू ढुसण्या
आचळाला पान्हा नाही
कुणी कुणी कुठे कुठे
सांगतात काही बाही
असा विपरीत काळ
कधी पाहिलाच नाही
करपले शेत माझे
आता काय करू तरी
घरातही नाही अन्न
आली उपासाची पाळी
अन्नासाठी दाही दिशा
हिंडलो मी दारोदारी
साऱ्यांचीच तिच दशा
झाले सारेच भिकारी
चिल्लीपिल्ली मेली माझी
होती उपाशी बिचारी
फिरविले डोळे त्यांनी
माझ्या याच मांडीवरी
फाटले काळीज माझे
काय करू जगून मी
डोळे पाण्याने भरले
तरी घागर रिकामी
माझी घागर रिकामी
अन् घागर रिकामी
--- लबाड बोका
--- लबाड बोका
दुष्काळग्रस्तांना मदत करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा