३३ . उशीर
मंद वारे गंधणारे
मनी माझ्या केवडा
भोर काळी रात्र सारी
वेळ का रे एवढा
वाट तरी पाहू किती
जीव होई वेडापिसा
आठवे तुझी छबी भारी
वेळ का रे एवढा
तुझे असे भास होती
वाट तरी पाहू किती
जीव होई वेडापिसा
आठवे तुझी छबी भारी
वेळ का रे एवढा
तुझे असे भास होती
आरक्त होई चेहरा
धुंद झाल्या दिशा चारी
वेळ का रे एवढा
गात्र माझे थरथरे
अन नेत्र ही शोधी तुला
अजुनी मी उभी दारी
वेळ का रे एवढा
धीर तरी धरू किती
होई जीव बावरा
तरी तुझी अदा प्यारी
वेळ का रे एवढा
मी अशी आतुरलेली
तू नसशी का तेवढा
तुझी सारी त-हा न्यारी
वेळ का रे एवढा
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा