३६ .सोड रे
कुठे काय मी तुला रे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
खास माझ्या मर्जीतला
केला होता मी तुला
घास माझ्या घासातला
दिला होता मी तुला
राग येण्यासारखे काय एवढे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
माझ्याच बरोबरीने
वागवला होता मी तुला
कितींदा चुकलास तरी
वाचवला होता मी तुला
लागण्यासारखे काय सांग रे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
--- लबाड बोका
कुठे काय मी तुला रे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
खास माझ्या मर्जीतला
केला होता मी तुला
घास माझ्या घासातला
दिला होता मी तुला
राग येण्यासारखे काय एवढे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
माझ्याच बरोबरीने
वागवला होता मी तुला
कितींदा चुकलास तरी
वाचवला होता मी तुला
लागण्यासारखे काय सांग रे बोललो
सोड सारे, हा पहा मी चाललो
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा