३२ . धोका
ठेवू नकोस विश्वास
कधीच कुणावर
माझीही आहे वाईट
नजर तुझ्यावर
करतील कुणी बहाणा
तुझ्याशी मैत्रीचा
करतो जसा मीही
असून खात्रीचा
करतील खोटी स्तुती
आणि पाडतील फशी
करतो मी नेहमी
जशी तुझी तशी
देतील तुला थापा
आणि मारतील बढाया
करतो मी जसे
तुझे मन जडाया
रहा जपून तू जरा
अशा लोकांपासून
तसा धोका आहे तुला
खरा माझ्याचपासून
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा