३१ . स्वप्नपरी
मन ही सुंदर
गुण ही सुंदर
दुधात साखर
रूप ही सुंदर
स्वर ही सुंदर
सूर ही सुंदर
मुखकमलावर
भाव ही सुंदर
अधर ही सुंदर
नजर ही सुंदर
चाफेकळी की
नाक ही सुंदर
चाल ही सुंदर
गाल ही सुंदर
गालावरची
खळी ही सुंदर
हात ही सुंदर
दात ही सुंदर
शुभ्रकळ्यांचे
स्मित ही सुंदर
वेश ही सुंदर
केश ही सुंदर
भाळावरची
बट ही सुंदर
कांती सुंदर
बांधा सुंदर
सौंदर्याचे
नाव ही सुंदर
सारंच सुंदर
फारच सुंदर
स्वप्नपरी की
जणू तू सुंदर
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा