३० . व्यथा
गेलीस किती लांब तू
खुशाली सुद्धा नाही कळत
पाणी माझ्या डोळ्यांतील
अजूनही नाही खळत
आठवण खूप येते तुझी
आणि उदास होतं मन
आठवतात अजून सारे
तुझ्या सहवासातले क्षण
आठवते मला अजून
तुझे तेच गोड हसू
कधी काही कारणाने
तुझे ते लटके रुसू
सवय झाली होती तुझी
आता येतं खायला घर
तुझ्याशिवाय करमत नाही
मनच नाही थाऱ्यावर
मन माझं आशेवरती
सावरत नाही पुरतं अजून
तुझं सारं जपून ठेवलंय
तू परतून येशील म्हणून
विसरलीस तू मला
तुला नाही माझी ओढ
मीच झुरतोय तुझ्यासाठी
बरी जिरवलीस माझी खोड
अपेक्षा नाही तुझ्याकडून
तू सुखात रहा तिथे
जमलं तर ध्यानात ठेव
मी अजून आहे इथे
कळवत जा अधून मधून
तुझं कुशल मंगल क्षेम
काळजी खूप वाटते तुझी
माझं तुझ्यावर आहे प्रेम
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा