मनसे च्या आंदोलनावर कविता
२९ . आम्ही
वागवू नका आम्हास
किड्या मकोड्या परी
अजूनी आमुची जात
मर्द मराठ्याची आहे
समजू नका आम्हास
दुर्बळ आणि विकारी
अजूनी आमुच्या मनागटातील
जोर तसाच आहे
डिवचू नका आम्हास
गप्प आम्ही असलो जरी
अजूनी आमुच्या वाणीला
धार तीच आहे
अडवू नका आम्हास
आमुच्याच भूमीवरी
अजूनी आमुचे रक्त
उसळत तसेच आहे
दाखवू नका आम्हास
लाठ्या आणि पहारी
अजूनी आमुच्या तलवारीचा
वार तसाच आहे
छळू नका आम्हास
सत्तेच्या जोरावरी
अजूनी आमुचा पीळ
होता तसाच आहे
शिकवू नका आम्हास
देशभक्ती नाहीतरी
अजूनी आमुची छाती
निधडी तशीच आहे
विसरू नका आम्हास
आम्ही आग्या मोहोळापरी
अजूनी आमुचा डंख
अगदी तसाच आहे
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा