२८ . भूकंप
एकदम अचानक
हादरली धरती
कळेना काहीच
गुंगली मती
होतो शेतात मी
लावीत पाती
आले ध्यानात तरी
उशीर किती
धावलो तसाच
वाटून भीती
नाही नाही ते
विचार चित्ती
होत्या कोसळल्या
घराच्या भिंती
उध्वस्त होती
घराची जोती
गेलो हबकून
पाहिले सभोवती
माणसं माझ़ी कुणी
दिसत नव्हती
झालो वेडापिसा
उपसली माती
लागली त्यांची
प्रेतेच हाती
लाडकी माझ़ी पोरं
किती गोड होती
अशी कशी गेली
मला टाकून ती
ठेवून दगड
काळजा वरती
माझ्याच हातांनी
मी दिली मूठमाती
--- लबाड बोका
--- लबाड बोका
भूकंपग्रस्तांना मदत करा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा