२७ . आशावाद
नियती ही आपली
परिक्षा घेत असेल
देव ही आपला
अंत पहात असेल
कधीतरी पुढेमागे
परिस्थिती बदलेल
परिस्थितीच आपल्याला
जगायला शिकवेल
धीर नको सोडू
हे ही सारं संपेल
दुर्भाग्यही आपल्यापुढे
नक्कीच हात टेकेल
धीर नको सोडू
हे ही सारं संपेल
दुर्भाग्यही आपल्यापुढे
नक्कीच हात टेकेल
केव्हातरी आयुष्यात
तो ही दिवस उगवेल
सारं काही आपल्या
मनासारखं घडेल
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा