२६ . असा कसा
पाऊस येतो पाऊस जातो
पाऊस देतो पाऊस पाणी
पाऊस वनी पाऊस मनी
पाऊस गातो पाऊस गाणी
पाऊस पडतो पाऊस झडतो
पाऊस करतो पाऊस वृष्टी
पाऊस भला पाऊस ओला
पाऊस करतो जिवंत सृष्टी
पाऊस वेडा पाऊस खुळा
पाऊस करतो दंगामस्ती
पाऊस लहरी पाऊस कहरी
पाऊस नेतो वाहून वस्ती
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा