२३ . आळस
कामाचा आळस
श्रमाचा आळस
नेमाचा आळस ( शिस्तीचा )
प्रेमाचा आळस
चालायचा आळस
बोलायचा आळस
उठायचा आळस
बसायचा आळस
यायचा आळस
जायचा आळस
खायचा आळस
प्यायचा आळस
आळस आळस
किती हा आळस
आळसाचा मी
झालोय कळस
झालोय खूप आळशी
साळशीच्या संतांहून
मरायचाही केला आळस
तर यमाचं काय होईल
--- लबाड बोका
साळशीचे संत - कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यात साळशी
नावाचे गाव आहे. तिथे सहा संत रहात होते. ते एवढे आळशी
होते, की जेव्हा त्यांच्या झोपडीला आग लागली तेव्हा ते
आळसाने बाहेर पडले नाहीत आणि जळून मेले. त्या सहा
आळशी संतांवरून त्या गावाला साळशी नाव पडले अशी
दंतकथा आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा