२४ . आपलं घर
आहे हक्काचं
आपलं घर
आपल्या घराची
बातच और
आपल्या घरात
आपण राजे
राजाला भय
चोरा चिलटांचे
मनात सारखी
एकच भीती
शिरेल कोणी
काळोख्या राती
घरात नाही
कोणीच धीट
झोप लागेना
दिवसाही नीट
कडया कोयंडे
चोख बंदोबस्त
तरीही मन
नसे निर्धास्त
खिडक्यांनाही मग
लोखंडी गज
दारांना लागे
भक्कम साज
घराच्या भिंती
लाल चिरेबंदी
आपल्या घरात
आपण बंदी
असं कसं हे
आपलं घर
आपल्या घराचं
काही नाही खरं
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा