२५. नियती
ती अदृश्य अनामिक शक्ती
कुणी म्हणती तिला नियती
तिच्या इच्छे पुढती
कोणाचे चालत नाही
करते कुरघोडी ती
आपुल्या प्रयत्नांवरती
नाचवते तालावर ती
आपण फक्त कठपुतळी
आपण ठरवितो एक
आणि होते भलतेच
तिला जे मंजूर नसते
होत नाही कधीच
कधी आपुल्या हातून
होते अचाट काम
ती तिचीच करणी असते
आपण निमित्त मात्र
कधी नजर लागते तिची
होते साऱ्याची माती
लक्षुमीचीही करते ती
लंकेची पार्वती
कधी संकट काळी येते
धावून मदतीला ती
कधी असहाय्य करते
सोडून वाऱ्यावरती
कधी घेते डोक्यावर ती
कधी तुडविते पायदळी ती
कधी देते दिगंत किर्ती
कधी उठते जिवावर ती
कधी फिरते नियत नियतीची
करते अत्याचार ती
तिला आणणे ताळ्यावरती
नाही आपुल्या हाती
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा