३७ . खंत
आटवतंय सारं मला
एक वेळ अशी होती
जगायची माझी होती भ्रांत
मार्गच दिसत नव्हता काही
मन होतं चिंताक्रांत
भेटलास तेव्हा देवासारखा
तूच दिलास मला हात
धावून आलास मदतीला
नाही पाहिलास दिवस की रात
आहेत तुझे माझ्यावरती
उपकार किती किती अनंत
तुझ्यामुळेच आज मी
मिळवली आहे किर्ती दिगंत
आणि परिस्थिती बदलली आता
आज मी आहे श्रीमंत
पण हे सारं पहायला
तू कुठे आहेस जिवंत
--- लबाड बोका
आटवतंय सारं मला
मन अजून नाही शांत
भेट तुझी झाली नाही
तीच आहे उरी खंत
एक वेळ अशी होती
जगायची माझी होती भ्रांत
मार्गच दिसत नव्हता काही
मन होतं चिंताक्रांत
भेटलास तेव्हा देवासारखा
तूच दिलास मला हात
धावून आलास मदतीला
नाही पाहिलास दिवस की रात
आहेत तुझे माझ्यावरती
उपकार किती किती अनंत
तुझ्यामुळेच आज मी
मिळवली आहे किर्ती दिगंत
आणि परिस्थिती बदलली आता
आज मी आहे श्रीमंत
पण हे सारं पहायला
तू कुठे आहेस जिवंत
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा