३८ . प्रेम
प्रेम कधी असतं व्यक्त
कधी असतं फक्त
कधी कधी प्रेम असतं
सगळ्यापासून मुक्त
प्रेम कधी असतं त्यागात
कधी असतं भोगात
कधी कधी प्रेम असतं
निव्वळ योगायोगात
प्रेम कधी असतं बोलात
कधी असतं अबोल्यात
प्रेम असतं मुकपणे
पाझरणा-या डोल्यात
प्रेम कधी असतं भेटीत
कधी असतं विरहात
प्रेम असतं समजुतीने
मिटणा-या कलहात
प्रेम कधी असतं रागात
कधी असतं लोभात
प्रेम असतं कुशीमधून
अंकुरणा-या कोंभात
प्रेम कधी असतं मौनात
कधी असतं भावनांत
प्रेम असतं तुझ्यासाठी
केलेल्या कवनांत
--- लबाड बोका
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा