४५. तयारी
स्वातंत्र्याचा भोक्ता मी
रक्त माझं गरम आहे
शिवरायांचा वारस मी
भाग्य माझं परम आहे
सुखात आहे मी तरी
इतरांचं दुख्ख पहावत नाही
हे जे काही चाललंय ते
मला मुळीच मान्य नाही
इतरांनी केलं असेल म्हणून
मी सहन करणार नाही
प्राण घेऊन विरोध करेन
साधन सुचिता मानणार नाही
शांत आहे अजून मी
म्हणून काही षंढ नाही
तयारी मी करतो आहे
उद्याच्याच बंडाची
--- लबाड बोका
स्वातंत्र्याचा भोक्ता मी
रक्त माझं गरम आहे
शिवरायांचा वारस मी
भाग्य माझं परम आहे
सुखात आहे मी तरी
इतरांचं दुख्ख पहावत नाही
हे जे काही चाललंय ते
मला मुळीच मान्य नाही
इतरांनी केलं असेल म्हणून
मी सहन करणार नाही
प्राण घेऊन विरोध करेन
साधन सुचिता मानणार नाही
शांत आहे अजून मी
म्हणून काही षंढ नाही
तयारी मी करतो आहे
उद्याच्याच बंडाची
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा