४७. स्वातंत्र्याचं भवितव्य
कुठे आहे ते स्वातंत्र्य
जे तुम्ही सांगत होतात
आहेत अजून बरेच लोक
एकवेळ अन्नाला मोताद
अन्न, वस्त्र आणि निवारा
मुलभूत गरजा माणसाच्या
त्याही मिळत नसतील तर
काय उपयोग स्वातंत्र्याचा
लेकरं मरताहेत तशीच
तेव्हाही आणि आताही
काहीच करू शकत नाही
आपली भारत माताही
अजून मिळत नाही पाणी
मिळत नाहीत औषध उपचार
विरोध करणाऱ्याला मिळतो
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
शिक्षणाची तर बातच सोडा
धड नाहीत रस्ते, वीज
हुतात्म्यांच्या बलिदानाचं
सांगा कुठे झालंय चीज
लुटताहेत देशाला फक्त
नशिबाची लाडकी बाळं
स्वातंत्र्याचं भवितव्य आता
झालंय नुसतं, .... नुसतं काळं
--- लबाड बोका
कुठे आहे ते स्वातंत्र्य
जे तुम्ही सांगत होतात
आहेत अजून बरेच लोक
एकवेळ अन्नाला मोताद
अन्न, वस्त्र आणि निवारा
मुलभूत गरजा माणसाच्या
त्याही मिळत नसतील तर
काय उपयोग स्वातंत्र्याचा
लेकरं मरताहेत तशीच
तेव्हाही आणि आताही
काहीच करू शकत नाही
आपली भारत माताही
अजून मिळत नाही पाणी
मिळत नाहीत औषध उपचार
विरोध करणाऱ्याला मिळतो
तोंड दाबून बुक्क्यांचा मार
शिक्षणाची तर बातच सोडा
धड नाहीत रस्ते, वीज
हुतात्म्यांच्या बलिदानाचं
सांगा कुठे झालंय चीज
लुटताहेत देशाला फक्त
नशिबाची लाडकी बाळं
स्वातंत्र्याचं भवितव्य आता
झालंय नुसतं, .... नुसतं काळं
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा