४८. प्राक्तन
तो ही दगड
मी ही दगड
दोघेही होतो
ओबड धोबड
प्राक्तन दोघांचे
पूर्णतया वेगळे
कारण काय ते
मला ही न कळे
मूर्तिकाराने त्याला
दिला आकार
केला त्याच्यातून
देवच साकार
पाथरवटाने मला
घातले घाव
माझ्यात घेतला
चिऱ्याचा ठाव
देवत्वामुळे तो
झाला भाग्यवान
माझा मात्र रोज
होतो अपमान
तो मूर्तीचा दगड
त्याच्या गळा पुष्पहार
मी पायरीचा दगड
माझ्या माथी पायभार
--- लबाड बोका
तो ही दगड
मी ही दगड
दोघेही होतो
ओबड धोबड
प्राक्तन दोघांचे
पूर्णतया वेगळे
कारण काय ते
मला ही न कळे
मूर्तिकाराने त्याला
दिला आकार
केला त्याच्यातून
देवच साकार
पाथरवटाने मला
घातले घाव
माझ्यात घेतला
चिऱ्याचा ठाव
देवत्वामुळे तो
झाला भाग्यवान
माझा मात्र रोज
होतो अपमान
तो मूर्तीचा दगड
त्याच्या गळा पुष्पहार
मी पायरीचा दगड
माझ्या माथी पायभार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा