४३. निर्धार
नाही काही आम्ही आज
गप्प मुळी बसणार
नाक आमचे आम्ही आता
इथे तिथे खुपसणार
नाही काही आम्ही आज
ऐकणार, बोलणार
नाकानेच कांदे आम्ही
फोडणार, सोलणार
नाही काही आम्ही आज
मानणार, हाणणार
नाकी नऊ तुमच्या मात्र
आता नक्की आणणार
नाही काही आम्ही आज
झापणार, छापणार
नाक मात्र आम्ही तुमचे
शंभर टक्के कापणार
नाही काही आम्ही आज
नाकदु-या काढणार
नाक मुठीत धरून तुम्हाला
शरण आम्ही आणणार
--- लबाड बोका
नाही काही आम्ही आज
गप्प मुळी बसणार
नाक आमचे आम्ही आता
इथे तिथे खुपसणार
नाही काही आम्ही आज
ऐकणार, बोलणार
नाकानेच कांदे आम्ही
फोडणार, सोलणार
नाही काही आम्ही आज
मानणार, हाणणार
नाकी नऊ तुमच्या मात्र
आता नक्की आणणार
नाही काही आम्ही आज
झापणार, छापणार
नाक मात्र आम्ही तुमचे
शंभर टक्के कापणार
नाही काही आम्ही आज
नाकदु-या काढणार
नाक मुठीत धरून तुम्हाला
शरण आम्ही आणणार
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा