५५. छान कविता
कोणीतरी केलं मुक्त
कवितेला छंदांतून
बरं झालं सुटलो मी ते
छंदांच्या फंदांतून
कसली ती वृत्तं अन्
कसल्या त्या मात्रा
उर्मीच मरून जायची साली
सगळी नुसती जत्रा
लिहितो आता काहीतरी
माझ्या मनाने मी स्वत:
लोक म्हणतात तोंडावर तरी
छान आहे कविता
--- लबाड बोका
कोणीतरी केलं मुक्त
कवितेला छंदांतून
बरं झालं सुटलो मी ते
छंदांच्या फंदांतून
कसली ती वृत्तं अन्
कसल्या त्या मात्रा
उर्मीच मरून जायची साली
सगळी नुसती जत्रा
लिहितो आता काहीतरी
माझ्या मनाने मी स्वत:
लोक म्हणतात तोंडावर तरी
छान आहे कविता
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा