५७. हतबल
पार गांजलोय दारिद्र्याने
कर्ज तरी किती काढू
हातावरचं पोट माझं
लाचार तरी किती होऊ
उसवलेल्या आयुष्याला
टाके तरी किती घालू
फाटक्या या संसाराला
ठिगळं तरी किती लावू
नको झालंय जीणं आता
कुठवर असा गाडा खेचू
कर देवा सुटका माझी
नको आणखी अंत पाहू
--- लबाड बोका
पार गांजलोय दारिद्र्याने
कर्ज तरी किती काढू
हातावरचं पोट माझं
लाचार तरी किती होऊ
उसवलेल्या आयुष्याला
टाके तरी किती घालू
फाटक्या या संसाराला
ठिगळं तरी किती लावू
नको झालंय जीणं आता
कुठवर असा गाडा खेचू
कर देवा सुटका माझी
नको आणखी अंत पाहू
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा