६०. कवितेचा जन्म
आताशा सुचतं मला
रोज नवीन काहीबाही
मारतो भराऱ्या कल्पनेच्या
पडतात कमी दिशा दाही
येतात अचानक मनामध्ये
वाक्यं सुंदर सुंदर काही
त्यांचीच पुढे होते कविता
ह्यात मुळीच वाद नाही
माझंच मला वाटतं नवल
कसं होतं असं काही
खरंच सांगतो देवाशप्पथ
मलाच काही कळत नाही
--- लबाड बोका
आताशा सुचतं मला
रोज नवीन काहीबाही
मारतो भराऱ्या कल्पनेच्या
पडतात कमी दिशा दाही
येतात अचानक मनामध्ये
वाक्यं सुंदर सुंदर काही
त्यांचीच पुढे होते कविता
ह्यात मुळीच वाद नाही
माझंच मला वाटतं नवल
कसं होतं असं काही
खरंच सांगतो देवाशप्पथ
मलाच काही कळत नाही
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा