६१. प्रतिक्रिया
धटाशी मी आहे धट
उद्धटाशी त्याहून उद्धट
वागतो तुमच्याशी सभ्यपणे
समजू नका मला नेभळट
करू नका अपमान माझा
तुमचाही मग करीन अपमान
चुकून जरी भेटलात तरी
मोडून टाकीन तुमची मान
असेल अक्कल तुम्हाला तर
लागू नका माझ्या नादी
हिंसेचं मला वावडं नाही
आहे मी पूरा प्रतिक्रियावादी
--- लबाड बोका
धटाशी मी आहे धट
उद्धटाशी त्याहून उद्धट
वागतो तुमच्याशी सभ्यपणे
समजू नका मला नेभळट
करू नका अपमान माझा
तुमचाही मग करीन अपमान
चुकून जरी भेटलात तरी
मोडून टाकीन तुमची मान
असेल अक्कल तुम्हाला तर
लागू नका माझ्या नादी
हिंसेचं मला वावडं नाही
आहे मी पूरा प्रतिक्रियावादी
--- लबाड बोका
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा